डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 13, 2024 6:53 PM

printer

मुंबईत डबेवाले आणि गटई कामगारांसाठी १२ हजार घरकुलं उभारण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या

डबेवाले तसंच गटई कामगारांसाठी मुंबईत परवडणाऱ्या दरात घरांची निर्मिती केली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून बारा हजार घरे बांधली जाणार असून म्हाडाच्या माध्यमातून मंजूर केली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहात मुंबई डब्बेवाला, चर्मकार संघटना आणि प्रियंका होम्स रियल्टी यांच्यात यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला.