January 8, 2026 3:15 PM | ambarnath | BJP

printer

अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश

अंबरनाथ नगरपालिकेतल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित १२ नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत त्यांचा नवी मुंबईत हा कार्यक्रम झाला. 

 

भाजपासोबत युती केल्यानं काँग्रेसनं काल त्यांचं निलंबन केलं होतं. पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता थेट निलंबनाची कारवाई केली, असा आरोप अंबरनाथ कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केला होता. 

 

त्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा काल रात्री रविंद्र चव्हाण यांनी केली होती. अंबरनाथच्या विकासासाठी आणि नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हा निर्णय कोणत्याही सत्तालोभापोटी नसून, विकासाच्या मुद्द्यावर आधारित असल्याचं चव्हाण म्हणाले होते.