डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश  प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शैक्षणिक वर्ष २०२५-२६  साठी अकरावीच्या  ऑनलाईन प्रवेश  प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये  विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सराव करण्यासाठी नोंदणी आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल.

 

० मे रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे सराव अर्ज उपलब्ध असतील. प्रवेशासाठी  अंतिम  अर्ज २१ मे ते २८ मे  या कालावधीत भरता येतील. विद्यार्थी कमीतकमी १ आणि जास्तीतजास्त १० महाविद्यालयांच्या नावाचा पसंतीक्रम देऊ शकतात. तात्पुरती गुणवत्ता यादी ३० मे रोजी प्रसिद्ध केली जाईल. काही आक्षेप असल्यास विद्यार्थी  १ जून पर्यंत तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतात. अंतिम गुणवत्ता यादी ३ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती संचालनालयानं दिली  आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा