डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधिमंडळांची कार्यक्षमता आणि कामकाज सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्यायला हवा – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

विधानमंडळांची कार्यक्षमता आणि कामकाज सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्यायला हवा, असं मत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रकुल देशांमधल्या लोकप्रतिनिधी गृहांच्या संघटनांचं १० वं संमेलन नवी दिल्लीत भरलं आहे. त्यात ते बोलत होते. विधानमंडळांनी विविध व्यासपीठांवर चर्चा करून तळागाळातल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कल्याणकारी योजनांना आकार द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. तंत्रज्ञान आणि दळणवळणाची साधनं दैनंदिन जीवनाचा एक भाग बनलेली आहेत अशावेळी लोकप्रतिनिधींनी जनतेच्या वाढत्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत. तसंच शाश्वत विकास आणि सर्वसमावेशक प्रशासनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विधिमंडळ संस्थांनी जबाबदार आणि कार्यक्षम भूमिका घ्यायला हवी, असं बिर्ला यावेळी म्हणाले.