कर्णबधीरांच्या स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल भारतीय चमुचं प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालालंपूर इथे झालेल्या १०व्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्स २०२४ मध्ये, अर्थात कर्णबधीरांच्या स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल भारतीय चमुचं अभिनंदन केलं आहे. 55 पदकं जिंकून देशासाठी अभिमानस्पद काम करणाऱ्या या प्रतिभावान खेळाडूंचं मोदी यांनी कौतुक केलं. या खेळांमधील भारताची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. संपूर्ण देशाला, विशेषत: खेळाची आवड असलेल्यांना या पराक्रमामुळे प्रेरणा मिळल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.