एनसीबी, अर्थात अमली पदार्थ नियंत्रण मंडळानं या वर्षात अमली पदार्थांच्या तस्करीची १०३ प्रकरणं उघडकीला आणली असून, २१९ जणांविरोधात कायदेशीर कारवाई केली. २०२१ साली भारत-पाकिस्तान सीमा भागातून अमली पदार्थ जप्त केल्या प्रकरणी एनसीबी चंदीगडनं नुकतंच एका तस्कराला १२ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा दिली, आणि दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला. तर बाराबंकी इथल्या एनडीपीएस न्यायालयानं २०२२ सालच्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणी दोषी व्यक्तीला १० वर्षांची सक्तमजुरी आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
समाजाला अमली पदार्थांच्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी अमली पदार्थ नियंत्रण मंडळ पूर्ण क्षमतेनं कार्यरत असल्याचं याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.