राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा शंभर वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन केल्याची माहिती संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी दिली आहे. बंगळुरू इथे आज झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधींच्या तीन दिवसीय राष्ट्रीय सभेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या निमित्ताने औपचारिक उत्सव आयोजित केलेला नाही, यंदा विजयादशमीपासून विविध कार्यक्रम सुरू होतील, असंही ते म्हणाले. सामाजिक सौहार्द आणि राष्ट्रीय एकता वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर जनसंपर्क कार्यक्रम आयोजित केले जातील, असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | March 23, 2025 7:56 PM | RSS
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षं पूर्ण
