डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 7, 2024 12:48 PM | Bomb Attack | Gaza

printer

मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीमध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्यात १० पॅलेस्टिनी नागरिक ठार

मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात जवळपास दहा पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याची माहिती पॅलेस्टाईनमधल्या सूत्रांनी दिली आहे. मध्य खान यूनिस शहरातल्या कंदील कुटुंबाच्या घरावर इस्रायली लष्कराने केलेल्या हल्ल्यात पाच जण ठार झाले तर काही जण जखमी झाले. तसंच मध्य गाझातल्या नुसेरत निर्वासित छावणीतल्या शेहदा कुटुंबाच्या घरावर केलेल्या हल्ल्यात पाच जण मृत्यूमुखी पडले. घरांच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता गाझाच्या आरोग्य विभागानं वर्तवली आहे. याआधी मागच्या शुक्रवारी इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात १८ पॅलेस्टिनी मारले गेल्याचं गाझातल्या वैद्यकीय विभागानं सांगितलं आहे.