July 10, 2024 9:18 AM | Hasan Mushrif

printer

राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणंत्री हसन मुश्रीफ

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून राज्यात दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. मराठवाड्यात हिंगोली आणि जालन्यासह राज्यात १०० विद्यार्थी क्षमतेची ही महाविद्यालयं सुरु करण्यासाठी, राष्ट्रीय वैद्यक परिषदेकडे अर्ज देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या महाविद्यालयात अध्यापकांची पदं भरण्याची कार्यवाही राज्य लोकसेवा आयोगामार्फत सुरु असून, वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि संलग्नित रुग्णालय या संदर्भातली कार्यवाही पूर्ण झाली असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.