१० मिनिटात वस्तू घरपोच देण्याची सुविधा बहुतांश कंपन्या लवकरच बंद करणार आहेत. यामुळं या वस्तू घरपोच पोहोचवणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची निश्चिती होईल आणि त्यांना कामासाठी पोषक वातावरण मिळेल. यासंदर्भात Blinkit, Zepto, Zomato आणि Swiggy यासारख्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची सरकारनं बैठक घेतली होती आणि जलद वस्तू पोहोचवण्याच्या संदर्भात काळजी व्यक्त केली होती. Blinkit नं त्यांच्या जाहिरातींमधून १० मिनिटात डिलिव्हरीचं आश्वासन काढून टाकलं आहे. येत्या काही दिवसात इतरही कंपन्या याची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.
Site Admin | January 13, 2026 7:10 PM | 10 Minute Delivery | Blinkit | Swiggy | Zepto | Zomato
१० मिनिटांत वस्तू घरपोच देण्याची सुविधा लवकरच बंद!