संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी रत्नागिरीत निबे कंपनीची १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

राज्याचा उद्योग विभाग आणि संरक्षण क्षेत्रात काम करणारी निबे लिमिटेड कंपनी यांच्यात काल रत्नागिरीमध्ये सामंजस्य करार झाला. संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी निबे कंपनी रत्नागिरीत एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून सुमारे एक ते दीड हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रातला आणखी एक नवा प्रकल्प रत्नागिरीत आणला जात असून, त्यातून 10 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत, असं सामंत यांनी यावेळी सांगितलं. संरक्षण क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधींची माहिती देणारं व्याख्यान यावेळी झालं; तसंच संरक्षणविषयक उत्पादनं, शस्त्रास्त्रं यांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं.