राज्यातल्या सुमारे साडे बाराशे महसुली मंडळात चारा डेपो उभारायला राज्य सरकारची परवानगी

राज्यातल्या अनेक भागात पावसाचं आगमन झालं असलं तरी अनेक विभागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही म्हणून १ हजार २४५ महसुली मंडळात चारा डेपो उभारायला शासनानं परवानगी दिली आहे. राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जनावरांचं पालन करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या राज्यात सुमारे ५१२ लाख मेट्रिक टन हिरवा चारा तर सुमारे १४४ लाख मेट्रिक टन सुका चारा उपलब्ध आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.