सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी चालवण्यात आलेल्या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ आत्तापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी घेतला आहे. उत्सवांचा हा काळ संपेपर्यंत हा आकडा अडीच कोटीपेक्षा वर जाईल, अशी अपेक्षा असल्याचं रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठी गुंतवणूक झाली असून विशेष गाड्यांची संख्याही विक्रमी झाली आहे, असं मंत्रालयानं नमूद केलं आहे.
Site Admin | October 26, 2025 1:29 PM | Train
सणासुदीच्या काळात दीड कोटी प्रवाशांनी घेतला विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ