डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विश्व पोलीस, आपत्ती व्यवस्थापन सेवा आणि अग्निशामक दल क्रीडा स्पर्धेचं  २०२९ वर्षाचं यजमानपद भारताकडे

विश्व पोलीस, आपत्ती व्यवस्थापन सेवा आणि अग्निशामक दल क्रीडा स्पर्धेचं  २०२९ या वर्षाचं यजमानपद भारताला मिळाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी ही घटना असल्याची प्रतिक्रिया त्यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. भारतातल्या क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाल्याचं हे द्योतक असल्याचं ते म्हणाले. अहमदाबादमधे ५० हून अधिक क्रीडा प्रकारात ही स्पर्धा होईल.