डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 26, 2025 7:14 PM

printer

ॲप-आधारित वाहनचालकांनी नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई होणार

ॲप-आधारित वाहनचालकांनी नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. 

 

मुंबईत अनेक ॲप-आधारित वाहनं प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करत असल्याच्या तक्रारींनंतर परिवहन विभागाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही दिवसांत २६३ अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तब्बल ३ लाख ८८ हजार इतका दंड ठोठावण्यात आला आहे.

 

सरनाईक म्हणाले की, शासनाच्या निर्णयानुसार ॲप-बेस वाहने चालविण्यासाठी चालकांकडे वैध परवाना असणे तसेच चालकांना भाड्याच्या रकमेपैकी ८० टक्के भाडे देणे बंधनकारक असून, प्रवाशांकडून ठरविलेल्या दरापेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही.