९७ वा अकादमी पुरस्कार सोहळा काल अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये झाला. शॉन बेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अनोरा या चित्रपटाने सर्वात जास्त ५ पुरस्कार जिंकले.
या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संपादन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे पुरस्कार मिळाले.‘द ब्रुटलिस्ट’ साठी अॅड्रियन ब्रॉडी हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्करचा मानकरी ठरला.