November 25, 2025 3:38 PM

printer

२९ कामगार कायदे चार कामगार संहितामधे समाविष्ट-पियूष गोयल

मंजुरी मिळण्यातले अडथळे कमी करण्यासाठी आणि कागदपत्रं सुटसुटीत करण्यासाठी २९ कामगार कायदे  चार कामगार संहितामधे समाविष्ट केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं नॅशनल ट्रेड लीडर परिषदेत ते आज बोलत होते.

 

नवीन कामगार संहितांमुळे कामगारांना किमान हमी वेतनाची हमी, गिग कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळेल असं गोयल म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारच्या पातळीवर व्यापाऱ्यांसाठी एकल परवाना पद्धत सुरू करण्याचाही सरकार विचार करत आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.