कॅनडामध्ये सुरू असलेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत २१ वर्षांखालच्या भारतीय संघानं जेतेपद पटकावलं. कुशल दलाल, मिहिर अपार आणि गणेश मणी रत्नम यांनी कंपाऊंड प्रकारात जर्मनीच्या संघाला नमवून सुवर्णपदकाची कमाई केली.
या स्पर्धेत १८ वर्षाखालच्या भारतीय संघानं अमेरिकेला नमवून कॅडेट अजिंक्यपदक पटकावलं. मोहित डागर, योगेश जोशी आणि देवांश सिंग यांचा या संघात समावेश होता.