January 18, 2026 12:39 PM | Maldives

printer

१७ वा दोस्ती त्रिपक्षीय सराव आज मालदीवमधील माले इथं सुरू

भारतीय तटरक्षक दल, श्रीलंका तटरक्षक दल तसंच मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल यांच्यात १७ वा दोस्ती त्रिपक्षीय सराव आज मालदीवमधील माले इथं सुरू झाला. दोस्ती सरावाचा बंदर टप्पा सध्या सुरू असून यामध्ये सहयोगी MARPOL सराव आणि संयुक्त VBSS कवायतींचा समावेश आहे. परस्पर कार्यक्षमता आणि सौहार्द वाढविण्यासाठी प्रदूषण प्रतिसाद उपकरणं, टेबलटॉप सराव आणि क्रॉस-बोर्डिंग SOP चं थेट प्रात्यक्षिक घेण्यात आले. शिवाय, भारतीय तटरक्षक दलाची जहाजं आणि विमानं पुढील सागरी टप्प्यात सहभागी होणार आहेत. यापूर्वी, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी यांना भारताच्या ‘SAGAR’ व्हिजन आणि शेजार-प्रथम धोरण राबवून द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाच्या प्रमुखांनी निमंत्रित केलं होतं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.