डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 22, 2024 7:13 PM

printer

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ७६ लाखापेक्षा जास्त

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं राबवल्या जात असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या ७६ लाखापेक्षा जास्त झाली आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी ही माहिती दिली. या उपक्रमाअंतर्गत सध्या मुंबईत २४३ दवाखाने सुरु असून, १ हजार १४० कर्मचारी कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत लवकरच आणखी ३७ नवे दवाखाने सुरु केले जाणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.