हस्तकला उद्योगाची निर्यात 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची अपेक्षा

हस्तकला उद्योगातून सुमारे 50 हजार कोटी रुपयांची निर्यात होते आणि लवकरच ही निर्यात 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत ‘क्राफ्टेड फॉर द फ्युचर’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. आजची तरुण पिढी पारंपरिक हस्तकलेचं महत्त्व जाणते असं सांगून गिरीराज सिंह म्हणाले की जगभरातील चाहत्यांना आवडतील अशी समकालीन उत्पादनं ते सादर करत आहेत. सरकारनं ‘हब अँड स्कोप’ मॉडेल अंतर्गत 100 कारागिरांसोबत भागीदारी करून हस्तकला उत्पादनं जगभरात निर्यात करण्यास सुरुवात केली आहे असंही ते म्हणाले.