June 26, 2024 10:56 AM | Nangal | Punjab

printer

हरजीतसिंग आणि कुलबीर सिंग या २ आरोपींच्या शोधासाठी १० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर

पंजाबमधील नांगल इथल्या विकास प्रभाकर या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींच्या शोधासाठी राष्ट्रीय तपास संस्थेनं प्रत्येकी 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. ही हत्या केल्याचा संशय असलेले हरजीतसिंग उर्फ लड्डी आणि कुलबीर सिंग उर्फ सिधु हे दोन आरोपी 9 मे पासून फरार आहेत. त्यांच्या विरुद्ध विविध कलमांखाली गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.