हमासला पूर्णपणे सत्ताच्युत करेपर्यंत युद्ध चालूच राहील- बेंजामिन नेतान्याहू

गाझापट्टीतल्या संघर्षाचा जोर ओसरला असला तरी हमासला पूर्णपणे सत्ताच्युत करेपर्यंत युद्ध चालूच राहील, असं इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी जाहीर केलं आहे. दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, इस्राएली फौजा लौकरच लेबनॉन हद्दीवर पाठवल्या जातील. या भागात हिजबुल्लांबरोबर गेले काही दिवस चकमकी वाढल्या आहेत.