डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

स्टेपन अवग्यान मेमोरियल स्पर्धेत बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसीचा विजय

भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसी याने अर्मेनिया इथं सुरू असलेल्या स्टेपन अवग्यान मेमोरियल स्पर्धेतल्या आज झालेल्या सामन्यात विजय मिळवला. त्यानं रशियाचा ग्रँडमास्टर वोलोदार मुर्जिन याचा ६३ चालींमध्ये पराभव केला. या विजयामुळे अर्जुननं बुद्धिबळ मानांकन क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जुनचा सामना अमेरिकेच्या मॅन्युअल पेट्रोसीन याच्याशी होणार आहे.