January 8, 2026 8:33 PM

printer

स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातले उद्योजक एकत्रितपणे भारताचं उद्याचं भविष्य घडवतील-प्रधानमंत्री

स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातले उद्योजक एकत्रितपणे भारताचं उद्याचं भविष्य घडवतील, असं प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. येत्या फेब्रुवारी मध्ये भारतात होणाऱ्या ‘इंडिया A-I इम्पॅक्ट समिट २०२६’, या  परिषदेच्या पार्श्वभूमीवर, प्रधानमंत्री मोदी यांनी आज नवी दिल्ली इथल्या त्यांच्या निवासस्थानी ए-आय, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या भारतीय स्टार्टअप्सची गोलमेज बैठक घेतली.

 

त्यावेळी ते बोलत होते. आपल्या देशाकडे नवोन्मेष आणि उपक्रमांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्याची प्रचंड क्षमता असल्याचं ते यावेळी म्हणाले. सामाजिक परिवर्तनामधलं कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं.  

 

‘ए-आय फॉर ऑल: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज’, अशी या परिषदेची संकल्पना असून, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी निवड झालेले १२ भारतीय ‘ए-आय’ स्टार्टअप्स आजच्या  बैठकीला उपस्थित होते. हे स्टार्टअप्स भारतीय भाषा मॉडेल, ए-आय आधारित ई-कॉमर्स, विपणन, आरोग्य सेवा निदान, वैद्यकीय संशोधन यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहेत.