सुप्रसिद्ध कवी, ‘मिर्झा एक्सप्रेस’ नावाने ओळखले जाणारे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग याचं आज, अमरावती इथं निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. अनेक कवी संमेलनात त्यांनी आपल्या शैलीनं रसिकांमध्ये स्थान निर्माण केलं होते. ‘मिर्झाजी कहीन’ हा त्यांचा वर्तमानपत्रातील स्तंभ लोकप्रिय झाला होता. मिर्झा यांचे २० काव्यसंग्रह प्रसिद्ध असून मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता. डॉ. मिर्झा हे आपल्या हास्यकविता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या कवितांसाठी ओळखले जात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मिर्झा बेग यांच्या निधनानं एक उत्तम विनोदी लोककवी आणि सामाजिक जाण असलेलं व्यक्तिमत्व गमावल्याचं मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.