एआयएफएफ सुपर कप फुटबॉल स्पर्धेचं जेतेपद गोवा फुटबॉल क्लबनं पटकावलं. गोव्याच्या मडगांव इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी पूर्व बंगाल फुटबॉल क्लबवर ६-५ अशी मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना एकही गोल न करता आल्यानं सुपर कपच्या इतिहासात पहिल्यांदाच पेनल्टी शूटआऊटनं सामन्याचा निर्णय झाला.
Site Admin | December 8, 2025 3:20 PM | AIFF
सुपर कप फुटबॉल स्पर्धेचं जेतेपद गोवा फुटबॉल क्लबनं पटकावलं