शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा होत्या.
पक्षामध्ये संघटनात्मक बदल करताना आपल्याला विश्वासात घेतलं नसल्यामुळे नाराज असल्याचं बडगुजर यांनी काल सांगितलं होतं. त्यामुळे पक्षाची भूमिका जाहीर करण्यासाठी जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी आज सकाळी नाशिकमधे पत्रकार परिषद घेऊन बडगुजर यांची हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं.