जपानच्या सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटिक पक्षानं साने ताकाइची यांची पक्षाच्या नेतेपदी निवड केली. त्यांची येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत जपानच्या प्रधानमंत्रीपदी निवड होणार आहे. जपानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री होण्याचा मान त्यांना मिळणार आहे.
जपानच्या माजी आर्थिक सुरक्षा मंत्री ताकाइची यांनी कृषी मंत्री शिंजिरो कोइझुमी यांचा दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीत पराभव केला. पहिल्या टप्प्यातल्या मतदानात पाच उमेदवारांपैकी कोणालाही बहुमत मिळालं नव्हतं. प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक झाली.