सहा दशकांच्या राष्ट्रसेवेनंतर भारतीय हवाई दलाने आज चंदीगडमध्ये मिग-२१ विमानाला निरोप दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे विमान निवृत्त झालं. एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी बादल ३ या कॉल साइनसह स्क्वाड्रनचं शेवटचं उड्डाण केलं. भारत-चीन युद्धानंतर १९६३ मध्ये भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आलेले मिग २१ हे देशातलं पहिलं सुपरसॉनिक लढाऊ विमान होतं. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात या विमानानं निर्णायक भूमिका बजावली. या विमानाने पाकिस्तानी हवाई दलाचं गंभीर नुकसान केलं.
Site Admin | September 26, 2025 1:21 PM | chandhigarh | MiG-21 Aircraft in Chandigarh
सहा दशकांच्या राष्ट्रसेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमानाला भारतीय हवाई दलाकडून निरोप