संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिलेल्या वृत्तानुसार, या अधिवेशनात 19 दिवसांच्या कालावधीत एकंदर पंधरा सत्रं होतील तसंच 13 विधेयकं मंजूर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकारनं काल नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वपक्षीय बैठक झाली. बैठकीला 36 राजकीय पक्षांचे 50 नेते उपस्थित होते. बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना हिवाळी अधिवेशनादरम्यान सहकार्य करण्याचं आवाहन केलं असून दोन्ही सभागृहांच्या नियमांनुसार सरकार सभागृहात इतर कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचं ते म्हणाले.