आत्मनिर्भर भारत या संकल्पनेद्वारे संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी संरक्षण खरेदी नियमावलीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल मंजुरी दिली. यामुळे संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या सेवांसाठी खरेदी जलद होईल, सोप्या प्रक्रियेद्वारे देशांतर्गत उद्योग सक्षम होतील, नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन मिळेल आणि उद्योगांना पाठिंबा मिळेल असं संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.
सुधारित नियमावली आधुनिक काळातील युद्धामध्ये सशस्त्र दलांच्या वाढत्या गरजा पूर्ण करेल असंही यात म्हटले आहे. यामुळे तीनही दलांसाठी आवश्यक उत्पादनांच्या निर्मितीसाठी जलद निर्णय घेता येतील. संरक्षण सेवा आणि संरक्षण मंत्रालयाअंतर्गत इतर संस्थांकडून वस्तू आणि सेवा खरेदी या नियमावलीद्वारे नियंत्रित केली जाते.