January 11, 2026 1:22 PM | rassia ukren

printer

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक होणार

रशियाने यूक्रेनवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक उद्या होणार आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी ही माहिती दिली. या हल्ल्यांमध्ये मध्यम-पल्ल्याच्या मारक क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता. हे हल्ले त्वरित थांबवावेत, तसंच यूक्रेनमधील नागरिकांचं संरक्षण, युक्रेनचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी पाठिंबा देण्याचं आवाहन आंद्री सिबिहा यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला केलं. तर दोन्ही देशांमधे तणाव वाढवण्यासाठी युरोप जबाबदार असल्याचा आरोप रशियानं केला आहे.

दरम्यान रशियाने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून काल युक्रेननं रशियाच्या दक्षिणेकडील वोरोनेझ शहरावर ड्रोन हल्ले केले. यात किमान चार जण जखमी झाले आणि अनेक इमारतींचे नुकसान झालं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.