संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार उद्या केनियाला होणाऱ्या तिसऱ्या भारत-केनिया संरक्षण प्रदर्शन आणि चर्चासत्रासाठी चार सदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. संरक्षण उत्पादन विभागाच्या ब्रँड इंडिया योजनेअंतर्गत हा तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमामध्ये २० भारतीय संरक्षण कंपन्या विविध संरक्षण उत्पादनं आणि सेवांचं प्रदर्शन करतील, अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली. या भेटीदरम्यान संजीव कुमार केनियाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका देखील घेतील. भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतांना प्रोत्साहन देणं आणि परस्पर सहकार्याच्या संधींचा शोध घेणं हे द्विपक्षीय बैठकांचं उद्दिष्ट असेल.
Site Admin | January 18, 2026 12:27 PM | keniya | sanjeev kumar
संजीव कुमार करणार तिसऱ्या भारत-केनिया संरक्षण प्रदर्शन आणि चर्चासत्रासाठी चार सदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व