January 24, 2026 2:50 PM

printer

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी वर्षानिमित्त नांदेड इथं शहीदी सत्संग सोहळ्याचं आयोजन

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी वर्षानिमित्त आज आणि उद्या महाराष्ट्रात नांदेड इथं शहीदी सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातल्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी नांदेड इथं येणार आहेत. या अनुषंगाने आज सकाळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा ते मोदी मैदान पर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. काल झालेल्या विशेष कीर्तन सोहळ्यात ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ‘शब्द गुरबानी’चे गायन करून अनोखी स्वरांजली अर्पण केली.