श्रीनगरच्या हरवान परिसरातल्या लिदवास इथं लष्करानं आज तीन दहशतवाद्यांचा खातमा केला. पहलगाममधे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बैसरन गावात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी महादेव ही मोहीम लष्करानं सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून आजची कारवाई केल्याचं लष्करानं स्पष्ट केलं आहे. ही मोहीम अजून सुरू आहे.
Site Admin | July 28, 2025 7:19 PM
श्रीनगरच्या लिदवास इथं तीन दहशतवाद्यांचा खातमा
