डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी झालेल्या संघर्षात ४२ जणांवर गुन्हा दाखल

मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ काल आयोजित निषेध मोर्चाच्यावेळी दोन गटांमधे झालेल्या संघर्ष प्रकरणी ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.  

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या या संघर्षात किल्ल्याच्या भिंतीचं नुकसान झालं आहे. तणावाच्या परिस्थितीमुळे किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना राबवल्या आहेत.