मुंबई आणि उपनगरातल्या नागरिक, व्यावसायिक आणि कंपनी मालकांना आता कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे. महसूल विभागानं नुकताच या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. रहिवासी किंवा व्यावसायिकांना त्यांच्याच विभागातल्या मुद्रांक कार्यालयात नोंदणी करण्याची अट काढून टाकण्यात आली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातल्या नागरिकांना आता बोरिवली, कुर्ला, अंधेरी, ओल्ड कस्टम हाऊस जवळचं प्रधान मुद्रांक कार्यालय या कार्यालयांत मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल.