काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नवी दिल्लीत भेट घेतली.
येत्या २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज उत्तम व्हावं ही विरोधी पक्षाची इच्छा आहे. यंदाच्या अधिवेशनात जनतेसाठीच्या अनेक धोरणात्मक, राजकीय, सामाजिक- आर्थिक विषयांवर चर्चा होणं आवश्यक असल्याचं खरगे आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत.