डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 8, 2024 7:15 PM | Gondia

printer

विनोद अग्रवाल यांच्या घरावर गोंड गोवारी समाजाचा धडक मोर्चा

गोंड, गोवारी जमातींना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पूर्ववत सुरू करण्याबाबत शासनानं सात दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन सुरु करु, असा इशारा या समाजानं दिला आहे. या मागणीसाठी गोंदिया जिल्ह्यात आज विनोद अग्रवाल यांच्या घरावर गोंड गोवारी समाजानं त्यांच्या धडक मोर्चा काढला. 

 

१९८५ च्या शासन निर्णयातली गोंड, गोवारी जमातीविषयी चुकीची माहिती तात्काळ दुरुस्ती करुन हे लाभ पूर्ववत सुरू करावेत, सेवानिवृत्त न्यायाधीश के एल वडने सर समितीला दिलेली मुदतवाढ रद्द करून सात दिवसाच्या आत या समितीचा अहवाल प्राप्त करावा, अशा मागण्यांचं निवेदन अग्रवाल यांना देण्यात आले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी सरकार विरोधी घोषणा देत १९८५ च्या शासन निर्णयाची होळी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.