डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात

विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी २ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येतील ३ जुलै रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ५ जुलै पर्यंत आहे.

 

१२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात मतदान होईल. मनीषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला दुर्राणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्यानं ही निवडणूक होत आहे.