January 18, 2026 4:13 PM | Nitin Gadkari

printer

विदर्भात भांडवली उद्योग स्थापन करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल -नितीन गडकरी

विदर्भातील नैसर्गिक संसाधनं, कृषी क्षेत्र आणि कृषी आधारित उद्योग तसंच सेवा क्षेत्र यांचं व्यवस्थापन करून विदर्भात भांडवली उद्योग स्थापन करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट यांच्या वतीने ‘ॲडव्हांटेज विदर्भ २०२६- खासदार औद्योगिक महोत्सव’ नागपूर मधे  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात आयोजित केला जाणार आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत ते आज नागपुरात बोलत होते. ॲडव्हांटेज विदर्भ अंतर्गत ३५० हून अधिक स्टॉल्सचं औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात येणार असून त्यामध्ये १०० एमएसएमईचे स्टॉल्स तसंच विदर्भातील विविध जिल्ह्यांचे ४० जिल्हास्तरीय स्टॉल्स असतील. या प्रदर्शनात डिफेन्स पब्लिक सेक्टर युनिट्स, सेबी, बीएसई, एनएसई, एमसीएक्स, एनसीडीएक्स, एएमएफआय, रिअल इस्टेट, अक्षय ऊर्जा आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रांतील उद्योगांचा सहभाग  असेल.