भारताचा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित वार्षिक महागाई दर मे महिन्यात ३९ शतांश टक्क्यापर्यंत घसरला असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालायने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. यात १ पूर्णांक ७२ शतांश टक्क्याची घट झाली आहे. वीज आणि इंधनाच्या किमतीही २ पूर्णांक २७ शतांश टक्क्यानी कमी झाल्या आहेत. उत्पादन क्षेत्रातल्या महागाई दरात दोन टक्क्याहून अधिक वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे.
Site Admin | June 16, 2025 3:23 PM
वार्षिक महागाई दर मे महिन्यात ३९ शतांश टक्क्यापर्यंत घसरला