October 19, 2024 3:21 PM

printer

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यात परभणी चणा-१६, सोयाबीनच्या एमएयूएस ७३१, देशी कापसाच्या पीए ८३३, अमेरिकन कापसाच्या एनएच ६७७ आणि तिळाच्या टीएलटी १० या वाणांचा समावेश आहे. हे वाण विकसित करण्यासाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या
वैज्ञानिकांचं अभिनंदन कुलगुरूंनी केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.