July 9, 2024 6:53 PM

printer

वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहा याला अटक

वरळी इथं रविवारी झालेल्या हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहा याला पोलिसांनी आज अटक केली. यावेळी त्याची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. मिहिरी याच्या गाडीनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांचे पती जखमी झाले होते. मिहीरचे वडील राजेश शहा हे शिवसेनेचे नेते असून अपघाताच्या घटनेनंतर त्यांना अटक झाली होती. मात्र त्यांना काल जामीन मिळाला. 

दरम्यान, याप्रकरणी मिहिरनं जुहू इथल्या ज्या बारमध्ये जाऊन मद्यपान केलं होतं तो बार उत्पादन शुल्क विभागानं सील केला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.