डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वक्फ बोर्डासंबधीच्या संयुक्त संसदीय समिती वक्फ बोर्ड कायद्याचा मसूदा येत्या २९ तारखेला पटलावर मांडण्याची शक्यता

वक्फ बोर्डासंबधीच्या संयुक्त संसदीय समिती वक्फ बोर्ड कायद्याचा मसूदा येत्या २९ तारखेला पटलावर मांडण्याची शक्यता आहे, परंतू या समितीनं अनेक राज्यांमधल्या बोर्डाच्या हरकती ऐकून घेतलेल्या नाहीत त्यामुळे समितीची मुदत वाढवावी अशी मागणी या समितीचे सदस्य असलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारानी केली आहे. समितीनं बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांचा दौरे केले नाहीत, तसंच दिल्ली, जम्मू काश्मीर, पंजाब आणि उत्तर प्रदेश सरकारची बाजू ऐकलेली नाही असं विरोधी पक्षांच्या सदस्यांनी म्हटलं आहे. समितीने एकूणच कामकाज गंभीरपणे चालवलं नाही असा आरोपही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केला आहे.