रेल्वेने प्रवासभाडे आकारणीत बदल केले असून ते येत्या २६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत. यात सर्वसामान्य वर्गाच्या प्रवास भाड्यात २१५ किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यापुढच्या सामान्य वर्गाच्या प्रवासाकरता प्रतिकिलोमीटर एक पैसा तर मेल – एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रति किलोमीटर २ पैसे भाडेवाढ झाली आहे. ५०० किलोमीटर अंतराच्या प्रवासाकरता १० रुपये जास्त मोजावे लागतील.
उपनगरी गाड्याच्या प्रवासभाड्यात बदल केलेला नाही असं रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.