राष्ट्रीय मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत निखत जरीन आणि लव्हलिना बोरगोहेन यांनी पटकावलं सुवर्णपदक

राष्ट्रीय मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत निखत जरीन आणि लव्हलिना बोरगोहेन यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे. महिला गटात, तेलंगणाच्या निखत जरीनने ५१ किलो वजनी गटात हरियाणाच्या नीतू घनघासचा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर लव्हलीनने ७५ किलो वजनी गटात सनमाचा चानू हिचा ५-० असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. ऑल इंडिया पोलिसची मीनाक्षी हुडा, प्रीती पवार, हरियाणाची मुष्टीयोद्धा पूजा राणी, अल्फिया खान, प्रांजल यादव आणि अरुंधती चौधरी यांनीही विविध वजन गटात सुवर्णपदक कमावलं. 

पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात मोहम्मद हुसामुद्दीनने गतविजेता सचिन सिवाच याला ३-२ असं नमवून सुवर्णपदक जिंकलं. जदुमणी सिंगने ५५ किलो वजनी गटात पवन वर्तवाल याचा पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. तर गेल्या वर्षी विश्वचषकात तीन रौप्यपदकं मिळवणाऱ्या अभिनाश जामवालला आदित्य प्रतापकडून ३-२ असा पराभव पत्करावा लागला. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.