डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मलावीचे राष्ट्राध्यक्ष लाझारस चकवेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा

अफ्रिकेच्या तीन देशांच्या दौऱ्यादरम्यान, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मलावीचे राष्ट्राध्यक्ष लाझारस चकवेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा घेतल्या. यावेळी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर भारत आणि मलावी यांच्यात चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारतानं मलावीला एक हजार मेट्रिक टन तांदूळ आणि भाभाट्रॉन कर्करोग उपचार मशीन सदिच्छा भेट म्हणून दिलं आहे. राष्ट्रपतीनीं मलावीमध्ये कायमस्वरूपी कृत्रिम अवयव प्रत्यारोपण केंद्र निर्माण करण्याची घोषणा केली.  

 

दरम्यान उद्या राष्ट्रपतींच्या दौऱ्याचा समारोप होणार असून राष्ट्रपती मलावीहून नवी दिल्लीला रवाना होणार आहेत. राष्ट्रपती उद्या श्री राधा कृष्ण मंदिर आणि मलावी तलावाला भेट देणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.