डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्य विधिमंडळाचं हे अधिवेशन आमच्यासाठी निर्धार आणि निश्चयाचं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य विधिमंडळाचं हे अधिवेशन आमच्यासाठी निर्धार आणि निश्चयाचं आहे. गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलं आहे. मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते. निरोप कोण कुणाला देतो, हे येणारा काळच ठरवेल, असंही ते म्हणाले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान आमच्या सरकारनं दिलं. शेताच्या बांधावर जाणारं हे सरकार आहे. शेतकऱ्यांची दुःखं आम्हाला समजतात, असंही शिंदे यांनी नमूद केलं. ड्रग्ज प्रकरणात संपूर्ण राज्यभर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ड्रग्जची विक्री होत असलेली बांधकाम उद्ध्वस्त करण्याच्या सूचना पुणे आयुक्तांना दिल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातल्या टपऱ्या हटवण्याचे आदेश दिले आहेत. तरुण पिढी वाया जाऊ नये, यासाठी सरकार पावलं उचलत आहे, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.